हिवाळ्यात पशुखाद्य वाढवावे का?
थंडीत शरीरातील तापमान राखण्यासाठी जास्त ऊर्जा खर्च होते. यासाठी जास्त पोषण आणि चारा महत्वाचा असतो.
खुराक कमी दिल्यास वजन घटते, थकवा येतो. एवढेच नाहीतर रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.
* ऊर्जा आणि वजन
थंडीत शरीरातील ऊर्जा अभावी वजन कमी होण्याचा धोका वाढतो.
पुरेसा चारा, संतुलित पशुखाद्य दिल्यास ऊर्जा भरून निघते आणि ताकदही वाढते.
दूध उत्पादन आणि गुणवत्ता
हिवाळ्यात खुराक कमी दिल्यास दुधाचे प्रमाण आणि फॅट कमी होऊ शकते.
पुरेसा चारा, प्रथिनयुक्त पेंड आणि खनिज मिश्रण दिल्यास दुधाचे उत्पादन आणि फॅट दोन्ही टिकून राहतात.
हिवाळ्यात द्यावयाचे प्रमुख पशुखाद्य
हिरवा चारा
सुका चारा
संकरीत खाद्य (दूध उत्पादनानुसार)
खनिज मिश्रण
ऊर्जा देणारे पूरक पदार्थ
गूळ (गुड)
तांदूळ कुट्टी
मका पावडर
मक्याचे तांदूळ
हिवाळ्यातील विशेष काळजी
पाणी कोमट द्यावे
रात्री गव्हाण/शेड उबदार ठेवावा
जनावरांना थंड वाऱ्यापासून दूर ठेवणे
सकाळ-संध्याकाळ चारा वेळेवर द्यावा
मातीशिवाय शेतीतून भरघोस उत्पादन भाग - 1
Learn more