महाराष्ट्रातील दख्खनचे पठार हे 6 कोटी वर्षापूर्वीच्या ज्वालामुखी उद्रेकामुळे तयार झाले आहे.

येथील काळी माती ही जगातल्या सर्वात सुपीक जमिनीपैकी एक मानली जाते. 

येथील सुपीक जमिनीत प्रामुख्याने ऊस, द्राक्ष, डाळिंब, कापूस यासारखे बागायती पिकांचे उत्पादन होते.

भारतात सुपीक जमीन मुख्यतः महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यात आढळून येते.  

महाराष्ट्रातील ज्वालामुखीनंतर तयार झालेली जमीन म्हणजे दख्खन ट्रॅप मधील काळी माती आणि काही भागात तांबडी माती. 

ही जमीन प्रामुख्याने बेसाल्ट या अग्निजन्य खडकांनी म्हणजे ज्वालामुखीच्या लाव्हा विघटनातून तयार झालेली जमीन आहे.

ही जमीन मुख्यतः महाराष्ट्राच्या पश्चिम, मध्य आणि दक्षिण भागात जसे की विदर्भ, खान्देश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात आढळते.

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, छ. संभाजीनगर, बीड, लातूर, परभणी, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, नागपूर, अमरावती या जिल्ह्यांमध्ये ज्वालामुखीच्या राखेपासून तयार झालेली सुपीक जमीन आहे. 

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने ज्वालामुखीच्या लाव्हा विघटनातून तयार झालेली काळी माती आहे.  

महाराष्ट्रातील काही भागांमध्ये ज्वालामुखीच्या राखेपासून तयार झालेल्या जमिनीची सुपीकता टिकून आहे. 

या पठाराची सरासरी उंची समुद्रसपाटीपासून सुमारे 600 मीटर (2000 फुट) आहे.

भारतात मुख्यत्वे दोन प्रसिद्ध ज्वालामुखी आहेत आयलंड (अंदमान-निकोबार) व नारकोंडम (अंदमान)

काय ? शेतीसाठी ज्वालामुखीची राख फायदेशीर ! - भाग 1