मोत्यांची शेती म्हणजे शिंपल्यांमध्ये कृत्रिमरित्या मोती तयार करणे.
ही शेती जलाशयात केली जाते आणि ती फारच कमी जागेतही फायदेशीर ठरते !
कोठे करता येते मोत्यांची शेती?
तलाव
कुंड
कृत्रिम टाक्या
नैसर्गिक जलसाठे
शांत, स्वच्छ व ऑक्सिजनयुक्त पाणी लागते.
शिंपल्यातील मोती वाढण्यासाठी 25°C ते 32°C तापमान असावे.
शिंपल्यात लहान ‘न्युक्लिअस’ म्हणजे कृत्रिम पदार्थ ठेवला जातो. नंतर शिंपले नैसर्गिकरित्या त्यावर लेप देतात. यामुळे काही महिन्यांत सुंदर मोती तयार होतो.
मोती तयार होण्यासाठी 8 ते 12 महिन्यांचा कालावधी लागतो.
1000 शिंपले घेऊन लघु स्तरावर सुरुवात केल्यास ₹75,000 ते 1,10,000 खर्च येईल.
1000 शिंपल्यांमधून किमान 700 - 800 मोती तयार होतात.
नफा किती होतो?
प्रत्येकी ₹150 ते ₹400 दर मिळतो.
8 - 12 महिन्यात 30,000 ते 1,50,000 लाख नफा मिळतो.
उत्कृष्ट व दर्जेदार मोती ₹1000 पेक्षा जास्त दरानेही विकला जातो.
कोण करू शकतो मोत्यांची शेती?
कमी जागा असलेले शेतकरी
महिला बचत गट
मत्स्य व्यवसायिक
नोकरी किंवा व्यवसायाच्या शोधात असलेले तरुण
जग संकटात आले तरी अन्नटंचाई नाही – कारण येथे आहे बियाण्यांचा खजिना
Learn more