केरळमधील कोची हे भारतातील पहिले शहर.. जिथे पाण्यावर चालणारी मेट्रो प्रणाली आहे.
कोची वॉटर मेट्रो ट्रेन ही मेड इन इंडिया असून ती अद्वितीय आहे.
यामुळे कोचीच्या अनेक बेटांवर राहणाऱ्या लोकांना स्वस्त व आधुनिक वाहतूक उपलब्ध झाले.
वॉटर मेट्रोमधून एका वेळेला 50 लोक प्रवास करू शकता.
वॉटर मेट्रोची सुरुवात
23 एप्रिल 2023 रोजी केरळमध्ये झाली.
यात लिथियम टायटेनेट ऑक्साईड बॅटरी वापरली आहे.
बॅटरीची क्षमता 122 KWH असून ही बॅटरी 10 ते 15 मिनिटात चार्ज होते.
काही ठिकाणी वॉटर मेट्रो चार्ज होण्यासाठी सुपर चार्जर बसवण्यात आले आहे.
ज्या ठिकाणी हवाई किंवा रस्ते वाहतुकीची सुविधा नाही तेथे जाणाऱ्या लोकांना वॉटर मेट्रो अतिशय उपयुक्त..
यात एकूण 38 टर्मिनल्स आहेत जे 10 बेटांना जोडतात व त्यात 78 इलेक्ट्रिक प्रोपेल्ड हायब्रीड बोटीचा समावेश आहे .
वॉटर मेट्रो ट्रेनचे दोन प्रकार आहेत. मोठ्या बोटीत 100 प्रवासी तर लहान बोटीत 50 प्रवासी प्रवास करतात.
मार्चमध्ये
व्यट्टिला आणि कक्कनड टर्मिनल दरम्यान पहिल्या वॉटर मेट्रोची ट्रायल
घेण्यात आली होती.
याचे तिकीट 20 रु. पासून सुरू होते. तसेच रोजच्या येणाऱ्या लोकांना मासिक पास उपलब्ध आहे.
वॉटर मेट्रो या बोटीची निर्मिती शिपयार्ड लिमिटेडने केली आहे.
या प्रकल्पाची किंमत 1,137 कोटी रुपये आहे.
78 बोटी व्यतिरिक्त आपात्कालीन परिस्थितीत आणि देखभालीसाठी मुख्य चार बचाव नौका आहेत.
वॉटर मेट्रो एकूण 15 मार्गांवर चालवण्याचा प्रकल्प आहे. ज्याची एकूण लांबी
76 किमी आहे.
या प्रकल्पासाठी केरळ सरकार आणि KFW (जर्मन फंडिंग एजन्सी) द्वारे निधी दिला आहे.
वॉटर मेट्रो ही व्यपीन, मुलावुकड, व्यट्टिला, कक्कनाड, एलूर, नेट्टूर, कुंबलम, वेलिंग्टन, बोलगट्टी आणि एडाकोची या 10 बेटांना जोडली आहे.
रंगीत मका बघितलाय काय ? नाही ना.. मग हे बघाच
Learn more