ओलसर हवामान, चिखल, संसर्गजन्य रोग आणि चारा साठवण यामुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.
पावसाळ्यात जनावरांची काळजी घेण्यासाठी
काही महत्त्वाचे उपाय पुढीलप्रमाणे..
Arrow
लसीकरण :
पशुवैद्यकांच्या सल्ल्याने घटसर्प, फऱ्या, खुरकत, पिंपरी यासारख्या रोगांवर प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे.
स्वच्छता :
गोठा स्वच्छ आणि कोरडा ठेवावा. मलमूत्र वेळीच साफ करून साचलेले पाणी
काढून घ्या.
आहार :
चांगला सकस आणि दूषित नसलेल्या चारा व पाणी जनावरांना द्यावे.
हिरव्या चाऱ्याबरोबर सुखा चाराही द्यावा जेणेकरून पोटफुगी होणार नाही.
जंतनाशक औषध :
जनावरांना पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार जंतनाशक औषध द्यावे.
कीटक नियंत्रण :
गोठ्यात गोचीड, माश्या, डास यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कीटकनाशकाची फवारणी करावी.
काळजी आणि निरीक्षण :
जनावरांना अस्वस्थता किंवा आजाराची लक्षणे दिसल्यास त्वरित पशुवैद्यकांकडून उपचार करावे.
काळजी आणि निरीक्षण :
जनावरांना अस्वस्थता किंवा आजाराची लक्षणे दिसल्यास त्वरित पशुवैद्यकांकडून उपचार करावे.
बनाना चिलिंग इंजुरी व उपाय.. भाग - 1
Learn more