रिले क्रॉपिंग म्हणजे एका शेतात दोन किंवा अधिक पिके एकाचवेळी पाठोपाठ घेणे.

रिले क्रॉपिंग या पद्धतीला नियोजन पद्धत असे म्हणतात.

यामध्ये पीक कापणीला येण्याचा अगोदर दुसऱ्या पिकाची लागवड केली जाते. 

यामुळे एकाच हंगामात दोन किंवा अधिक पिकाचे उत्पादन मिळते. 

नियोजन पद्धतीनुसार लागवड केल्यास शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होते. 

पहिले पीक काढणीला आल्यावर दुसऱ्या पिकाची लागवड केली जाते जेणेकरून जमीन रिकामी राहत नाही. 

पिके एकमेकांना पूरक असल्यामुळे खताची व पाण्याची बचत होते. 

एकाचवेळी विविध पीक घेतल्यामुळे जमिनीची सुपीकताही टिकून राहते.

पिकाच्या योग्य निवडीमुळे कीड व रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. 

विविध पिकांच्या लागवडीमुळे मातीतील पोषक तत्वांचे संतुलन राहते. 

नियोजन पद्धत अवलंबन केल्यामुळे पर्यावरणाचे  रक्षण होते. 

या पद्धतीत गहू आणि मोहरी, भात आणि मसूर, मका आणि भुईमूग, सुर्यफूल आणि हरभरा, इत्यादी पिकांची लागवड केली जाते.

पिकांचे प्राण्यांपासून संरक्षण करायचंय ?.. मग हे एकदा बघाच !