मानव आणि प्राण्यांच्या जीवनासाठी ऑक्सिजन सर्वात महत्वाचा... ऑक्सिजन वायूसाठी झाडांची आवश्यकता असते. पण तंत्रज्ञान आणि इमारती जसजशा पुढे जात आहेत तसतशी झाडांची संख्या कमी होत आहे. 

तुम्हाला माहित आहे का बियांचे गोळे म्हणजेच सीड बॉल काय आहेत? चला तर मग जाणून घेऊया सीड्स बॉल विषयी.. 

बियाणे, चिकणमाती आणि माती किंवा खताच्या लहान गोळ्यांना सीड बॉल म्हणतात. या बॉलच्या मध्यभागी बी ठेवले जाते...

सीड बॉल तंत्रज्ञानाच्या मदतीने बियाण्यांमध्ये दीर्घकाळ ओलावा टिकवून ठेवणे शक्य होईल आणि यामुळे बियाण्याची उगवण क्षमता वाढेल. सीड बॉल ओली माती, शेणखत किंवा नारळाच्या तंतू किंवा इतर खतांपासून तयार केले जातात.

बॉलच्या आकारात बनवून त्यात बिया टाकल्या जातात आणि नंतर हा बॉल उन्हात वाळवून साठवला जातो. पाऊस सुरू होताच तो उंच भागात फेकला जातो.

दालचिनी :  एक उपयुक्त मसाला