ही लाल भाजी म्हणजे आहे लाल भेंडी. लाल भेंडीचे वैशिष्ट्य म्हणजे ती हिरव्या भेंडीपेक्षा जास्त फायदेशीर आणि आरोग्यदायी असते. लाल भेंडीचे पीकही हिरव्या भेंडीच्या तुलनेत लवकर येते.
लाल भेंडीमध्ये विशेष औषधी गुणधर्म आहेत, त्यामुळे मोठ्या शहरांमध्ये तिला मोठी मागणी आहे. लाल भेंडीच्या लागवडीसाठी 1 किलो बियाणे 2,400 रुपयांपर्यंत मिळते. त्यातून अर्धा एकर जमिनीत लागवड करता येते.
लाल भेंडीपासून कमाईही जास्त होते. लाल भेंडीला हिरव्या भेंडीपेक्षा 5-7 पट जास्त भाव मिळतो. हिरवी भेंडी 40 ते 60 रुपये किलो असताना लाल भेंडी 300 ते 400 रुपये किलो दराने विकली जाते.
लाल भेंडीला देशापेक्षा परदेशात जास्त मागणी आहे. परदेशात त्याची शेती भरपूर केली जाते.
लाल भेंडीत अनेक प्रकारचे पौष्टिक घटक असतात. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि लोह मुबलक प्रमाणात आढळतात. लाल भेंडी मधुमेहाच्या रुग्णांसाठी रामबाण उपाय असल्याचे सांगितले जाते.
लाल भेंडी लागवड करताना पाण्याची कमतरता भासणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी लागते. लागवडीनंतर हे पीक अवघ्या 40 ते 50 दिवसांत काढणीसाठी तयार होते. लाल भेंडीची मागणी उन्हाळ्यात जास्त असते. अनेक शेतकरी आजकाल रेड लेडीफिंगरपासून भरपूर नफा कमावत आहेत.